|
|
|
प्रा.विजय तापस
27/02/2016
आज तुमच्याकडे येण्याचा योग आला आणि श्रीमंत झालो.हा संबंध कायम राहो !
|
|
चंद्रशेखर टिळक
16/02/2016
आज मा.श्री अवधूत परळकर आणि मा श्री प्रदीप भिडे यांच्यामुळे माहीम सार्वजनिक वाचनालयात येण्याचा योग आला.आणि एका अभूतपूर्व आनंदाचा धनी झालो. अगत्यशील आयोजन वेळेची शिस्त आणि सुंदर श्रोते.पुन्हा यायला नक्की आवडेल.
|
|
डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे
05/12/2015
वाचन संस्कृती टिकून राहावी व त्यातून सर्व आबालवृद्धांना ज्ञान मिळावे या उद्देशानी सुरू असलेल्या माहीम वाचनालयाची भेट खूप आनंद व समाधान देऊन गेली आम्हा उभयतांच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
|
|
अच्युत गोडबोले
08/11/2014
हे वाचनालय अतिशय झकास सगळ्याचा उत्साह खूपच ग्रेट : एकंदरीत प्रोग्रँम आवडला.आभार.
|
|
गिरीश कुबेर
24/09/2014
'जिवंत' वाचकांना भेटण्याचा आनंद माहीम सार्वजनिक वाचनालयाने दिला.त्या बद्दल मनापासून
|
|
विश्र्वास मेहेंदळे
12/01/2013
'देहबोली ते उपग्रहबोली' या कार्यक्रमाच्या निमित्तनं या ग्रंथालयाला भेट देण्याची संधि आमचे मित्र व ग्रंथालयाचे अध्यक्ष अवधूत परळकर / सदस्य प्रदीप भिडे आणि दातारसाहेबांच्या मुळं मिळाली. आनंद वाटला. एका समंजस प्रेक्षक - समूहासमोर कार्यक्रम सादर करताना होणारा आनंद हा वेगळाच असतो,तो अनुभवला. धन्यवाद.
|
|
अशोक बागवे
25/02/2012
ग्रंथालये,देवालये आणि विद्यालये ज्या ठिकाणी असते तिथे संस्कुतीचा विलय नसतो यांचे प्रत्यंतर मला आज आले. माहीम वाचनालय हे एक तीर्थालय आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पुन्हा या प्र्यागस्थानी यायला आवडेल.
|
|
डॉ. वि ना श्रीखंडे
26/06/2010
दादर येथे राहून माहीम येथे इतके उत्तम वाचनालय आहे याची मला माहिती नव्हती. समाजामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये उत्साहानी काम करणाऱ्या व्यक्ती भेटल्या की माझ्या सकारात्मक वृत्तीला चांगली दाद मिळते. समाजातील वृत्ती बदलण्याकरता वाचन संस्कृती जोपासन महत्वाच आहे.आपल्याला सुयश चिंतितो.
|
|
सिद्धार्थ पारधे
25/07/2009
वाचता वाचता वाचलो... हे घडले फक्त पुस्तकामुळे. माहीम सार्वजनिक वाचनालयाने आज मला माझ्या वाचकांना प्रत्यक्ष भेटायची संधी उपलब्ध करून दिली या बद्दल मी आभारी आहे.
|
|
नीला सत्यनारायण
31/08/2008
माहीम सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. आनंद वाटला. वाचनाची आणि प्रगल्भ होण्याची संस्कृती वाचनालयाने छान रुजवली आहे. सभासदांशी संवाद साधून खूप समाधान वाटले. वाचनालयाला लवकरच स्वत:ची वास्तू लाभो.
|